karad, maher, krishna ghat, public domain, home, river, sangam
Read Full Post

अस्सं माहेर सुरेख बाई

माहेर म्हटलं की कितीतरी आठवणी मनात फेर धरून नाचू लागतात. वाड्यावाड्यातून भोंडल्याचा फेर धरून म्हटलेले टिपेचे सूर घुमू लागतात. “आक्कण माती चिक्कण माती …”, “कारल्याचा वेल लाव ग सुने मग जा अपुल्या माहेराला, कारल्याचा वेल लावला हो सासूबाई आता तरी जाऊ द्या माहेरा …” — असे म्हणताना त्या सुनेवर होणारा अन्याय पाहून आम्ही जरा जास्तच आवेशात सासरला नावे ठेवत फेर नाचत असू. Continue reading > Experiences, Marathi, Women
black and white movies, marathi article on hollywood, article marathi hollywood, varsha shende
Read Full Post

हॉलिवूडपट आणि मी

आजकाल माझ्या एक गोष्ट लक्षात आलीय,की माझा विशितला मुलगा जर टीव्ही पहात असेल अन् मी ही तिथे जाऊन बसले तर तो ताबडतोब चॅनेल बदलतो अन् ब्राऊझिंग चालू करतो.अं हं! अं हं!! तुम्हाला वाटतय् ते कारण नाही बरं! तो खूपदा इंग्लिश मूव्हीजच बघत असतो. Continue reading > Experiences, Humor, Marathi
Read Full Post

चेरी

कुत्रे पाळण्याचा कोणताही पूर्वानुभव गाठीशी नाही. याबाबतीत पाटी कोरीच. शी-शू साठी माझी मदत होणार नाही हे मी स्पष्ट कबूल करून घेतलेले. तरीही ५ डिसेंबरला जन्मलेले ते इवलेसे काळेभोर पिल्लू आमच्याकडे आले ! … आणि “लॅब्रॅडॉर” नावाची कुत्र्यांची ब्रीड असते हा शोध मला त्या दिवशी लागला ! Continue reading > Experiences, Marathi, Stories
people, crowd, thoughts, culture, traditions, mansikta
Read Full Post

मानसिकता

१ आम्ही उभयता एका हॉटेलमध्ये गेलो होतो. थोड्या वेळाने हॉटेलचे मालक, जे आमच्या चांगले परिचयाचे आहेत, आमच्याकडे आले. विचारपूस करुन झाल्यावर ते माझ्याकडे वळले. .. “मॅडम, तुम्ही खूप छान लिहिता. परवा आलेला तुमचा लेख तर सुंदरच आणि अभ्यासपूर्ण होता. तुमची भाषाशैली पण उत्तम आहे.” स्तुती ऐकून मी मनात जाम खूष झाले. Continue reading > Experiences, Ideas, Marathi, Women
gift, wedding, notes, aher
Read Full Post

“आहेर”

मॉरिशसबद्दल ऐकलं खूप होतं. माझ्या तिथल्या नोकरीचा तिसरा चौथाच महिना असेल. प्राध्यापक आणि डॉक्टर्स मंडळींइतकाच मी, शिपाई, सफाई कामगार, कारकून, तंत्रज्ञ, सुरक्षारक्षक, ड्रायव्हर अशा सर्व प्रकारच्या लोकांमध्ये नेहमीच सहज मिसळतो. जॉन माझ्याच विभागात कारकून म्हणून काम करायचा. तिथल्या सगळ्याच लोकांप्रमाणे जॉन इंग्रजी किंवा मोडक्या तोडक्या हिंदीमध्ये माझ्याशी बोलायचा. Continue reading > Experiences, Ideas, Marathi, Stories
forties, time, flies, woman
Read Full Post

माझी चाळिशी

परवा सहज आरशात बघून केस विंचरताना  एक पांढरा केस अवतरला. खोलीत कोणी नाही असे पाहून हळूच उपटणार तेवढ्यात कन्यारत्न टपकले. “आई, काय करतेस गं ? बघू! अगं,  तुझा केस पांढरा झालाय. मागच्या वेळी मी उपटला होता तसा उपटू? पण, आई म्हणजे तू आता आज्जीसारखी म्हातारी होणार का गं? Continue reading > Experiences, Humor, Marathi, Women